Sunday, 27 July 2025

प्रत्येक गोष्टींना प्रमाणिकरण validation देणे गरजेचं आहे का?

प्रत्येक गोष्टीला validation म्हणजे प्रमाणिकरण द्यायची जेव्हा गरज भासत असेल तर समजून घ्या की ती व्यक्ती तुमच्या बद्दल एक दृष्टिकोन मांडून ठेवली आहे आणि ते कधीच बदलू शकत नाही,
तुमचं प्रेम त्यांच्यासाठी दिखावा असतो, तुमचं ञास त्यांना नाटक वाटतो, तुमचं वागणं त्यांना पटत नाही, तुमचं राहणं त्यांना आवडत नाही, तुम्ही जस आहात त्या प्रत्येक गोष्टींचा त्यांना त्रास होतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना वैतागून सुद्धा कुठे तरी छोटं का असेना थोड होप ठेवून नातं टिकाव म्हणून conversation ची सुरूवात करते ज्याचं अंत परत conflict च होणार आहे हे माहिती असून देखील,

कारण जसं जसं तुम्ही गैरसमजूत दूर करत असतात, आणि एक ठराविक पॉईंट वरती तुमचं बरोबर होणार असतं, तेव्हा समोरचा व्यक्तींकडून एक शब्द येतो, तू दरवेळी स्वतःला खरं करून मला खोटा ठरवतो, मला बोलायचंच नाही ह्या बद्दल.. आणि The end.

No comments:

Post a Comment