Sunday, 27 July 2025

बिनडोक म्हणावे त्यांना?

बिनडोक म्हणावे त्यांना?

माझंच हवं, माझंच चालावं,
माझ्या वेळेसच जग वळावं,
मी मूडी असेन, बोलू नका,
मी हसत नसेन, जवळ येऊ नका...

पण जेव्हा मी बोले, ऐका सगळं,
माझ्या दुखांवर टाका बाम थोडं,
मी बिझी असेन तर त्रास नको,
तुमचं दुःख? त्याला वेळच नको!

मग जे लोक थांबून घेतात,
मन जपत, स्वतः झाकून जगतात,
समजून घेतात माझे रंग,
ते खरोखरच का असतील दंग?

ते बिनडोक नाहीत, ते माणसं आहेत,
ज्यात अजूनही प्रेमाचं पाणी आहे,
माझ्या स्वार्थी सोबत ते चालले,
मन दुखवूनही कधी न हटले.

पण एक दिवस थकतील तेही,
विरतील त्या डोळ्यांतली ओलही,
तेव्हा उमगेन, मी एकटा आहे,
सगळ्या "माझ्या" मध्ये हरवलं "आपलं" काही.

म्हणून अजून वेळ आहे, समजून घे,
तुझा वेळ नाही, सर्वांचाही वेळ आहे रे,
समोरील चेहऱ्यांमध्ये स्वतःला बघ,
"बिनडोक" नव्हे, तेच तुझं खरं धन ठरू शकतं मग.

No comments:

Post a Comment