Sunday, 27 July 2025
कदाचित...
दृष्टिकोन
प्रत्येक गोष्टींना प्रमाणिकरण validation देणे गरजेचं आहे का?
मीपणा (I) – आत्मकेंद्री आयुष्याचं प्रतिबिंब
सगळ्यात स्वार्थी, एक अक्षर असलेला शब्द कोणता असेल तर तो म्हणजे *"मी"*.
हो... मीपणा!
आपण सगळं आयुष्य ह्याच *'मीपणा'* भोवती फिरवतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत, प्रत्येक क्षणाला आपण स्वतःचाच विचार करत असतो.
"मी" म्हणजे नक्की काय? ह्या मीपणाची सुरुवात कुठून होते?
ती सुरु होते *अपेक्षांपासून* –
* माझ्यासोबत असं व्हायला हवं,
* लोकांनी मला आदर दिला पाहिजे,
* माझं मन जसं म्हणेल तसं सगळं घडलं पाहिजे,
* मी काहीही करतो, तरी लोकांनी मला समजून घेतलं पाहिजे...
ही सगळी एक *अपेक्षांची जाळी* आहे. आपण अपेक्षित आयुष्य जगतोय, म्हणजे –
*"मला हे हवं", "माझी इच्छा", "माझं मन", "माझ्यासाठी"* –
सगळं काही "माझ्या" भोवती केंद्रित.
हेच "मीपण" आहे, आणि आपल्याला कदाचित याची जाणीवही नसते!
एखादी व्यक्ती मंदिरात जाते, तरी तिथेही तो *फक्त मागणं* करतो –
"देवा, मला हे हवं", "माझं ते पूर्ण कर"...
पण असं फार क्वचित ऐकायला मिळतं –
*"देवा, मला काहीतरी द्यायचं आहे"*
*"माझ्याकडे जे आहे, ते मी तुला अर्पण करतो"*
कारण, आपली अपेक्षा इतकी खोलवर मुरलेली असते, की दुसऱ्याला काही देणं हे आपल्याला सुचतच नाही.
पण जेव्हा माणूस सतत 'मी' या विचारात राहतो,
तेव्हा त्याचं मन *कधीच स्थिर राहत नाही.*
तो *निराश*, अस्वस्थ असतो.
कधीच समाधानी नसतो.
आपल्याला वाटतं की आपल्याभोवतीचे लोक आपल्याच्या अपेक्षा पूर्ण करायला हवे,
पण खरंच...
-का कोणी तुमचं समाधान करण्यासाठीच जगतंय?*
जर तुम्हाला तसं वाटत असेल,
तर माफ करा –
वेळ तुम्हाला सगळं शिकवेल.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं:
> "Be realistic in your expectations...
> You will never feel frustrated."
अपेक्षांपासून थोडंसं दूर जा,
"मी" वरून "आपण" कडे वळा,
तेव्हाच तुम्ही खरं *स्वतःला* ओळखाल.
---
✍ #Santoshhadapad