Sunday, 27 July 2025

कदाचित...


मनात खोल कुठेतरी दडलेल्या त्या शब्दांसाठी,
ज्यांना बोलता येत नाही... पण ऐकवता येतं.
इथं शब्द असतात – थोडेसे गोंधळलेले, थोडेसे स्पष्ट.
प्रेम, तुटलेपण, एकटेपणा, आशा, आणि स्वत्वाचा शोध –
हे सगळं जे "कदाचित" मध्ये सामावलेलं असतं.

इथे तुमचं स्वतःला शोधायला यावं,
मनातले आवाज ऐकायला यावं,
आणि कधी बोलायचं मनात असूनही न बोललेलं…
ते वाचायला यावं.

दृष्टिकोन

कधी कधी काही गोष्टी सोडून दिलेल बरं असत,
अपेक्षा, आदर, सन्मान, भांडण, गैरसमज ह्या सगळ्या पलीकडे ही एक जीवन होत ते कुठे तरी हरवून गेलंय,
आपणं जेव्हा परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतो ते तितकंच गुंतत जात, नात्यात पारदर्शकता हवं असतो पण एखाद्या बद्दल आपल्या मनात एक दृष्टिकोन तयार झाला आणि कायमचा तो असाच असेल जर ही मनस्थिती असेल तर त्यावेळी आपण त्यांना काही करू शकत नाही,

कारण ज्या माणसाना समजूत नसती त्यांना समजूतपणा घालता येतो, पण जे आधीच समजुतदार असतो त्यांना कसं समजावा, कुठे तरी ऐकलं होतं डोळ्यावर जर काळा चष्मा घातला तर अख्खं जगच काळा दिसतो,
त्याप्रमाणे माणसांचं दृष्टिकोन जर सगळ्यांबद्दल एकच असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, तिथे त्यामुळे कधी कधी गुंता जसाच्या तसा सोडून दिलेल बरं...

प्रत्येक गोष्टींना प्रमाणिकरण validation देणे गरजेचं आहे का?

प्रत्येक गोष्टीला validation म्हणजे प्रमाणिकरण द्यायची जेव्हा गरज भासत असेल तर समजून घ्या की ती व्यक्ती तुमच्या बद्दल एक दृष्टिकोन मांडून ठेवली आहे आणि ते कधीच बदलू शकत नाही,
तुमचं प्रेम त्यांच्यासाठी दिखावा असतो, तुमचं ञास त्यांना नाटक वाटतो, तुमचं वागणं त्यांना पटत नाही, तुमचं राहणं त्यांना आवडत नाही, तुम्ही जस आहात त्या प्रत्येक गोष्टींचा त्यांना त्रास होतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना वैतागून सुद्धा कुठे तरी छोटं का असेना थोड होप ठेवून नातं टिकाव म्हणून conversation ची सुरूवात करते ज्याचं अंत परत conflict च होणार आहे हे माहिती असून देखील,

कारण जसं जसं तुम्ही गैरसमजूत दूर करत असतात, आणि एक ठराविक पॉईंट वरती तुमचं बरोबर होणार असतं, तेव्हा समोरचा व्यक्तींकडून एक शब्द येतो, तू दरवेळी स्वतःला खरं करून मला खोटा ठरवतो, मला बोलायचंच नाही ह्या बद्दल.. आणि The end.

मीपणा (I) – आत्मकेंद्री आयुष्याचं प्रतिबिंब

सगळ्यात स्वार्थी, एक अक्षर असलेला शब्द कोणता असेल तर तो म्हणजे *"मी"*.

हो... मीपणा!

आपण सगळं आयुष्य ह्याच *'मीपणा'* भोवती फिरवतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत, प्रत्येक क्षणाला आपण स्वतःचाच विचार करत असतो.

"मी" म्हणजे नक्की काय? ह्या मीपणाची सुरुवात कुठून होते?

ती सुरु होते *अपेक्षांपासून* –

* माझ्यासोबत असं व्हायला हवं,

* लोकांनी मला आदर दिला पाहिजे,

* माझं मन जसं म्हणेल तसं सगळं घडलं पाहिजे,

* मी काहीही करतो, तरी लोकांनी मला समजून घेतलं पाहिजे...


ही सगळी एक *अपेक्षांची जाळी* आहे. आपण अपेक्षित आयुष्य जगतोय, म्हणजे –

*"मला हे हवं", "माझी इच्छा", "माझं मन", "माझ्यासाठी"* –

सगळं काही "माझ्या" भोवती केंद्रित.

हेच "मीपण" आहे, आणि आपल्याला कदाचित याची जाणीवही नसते!

एखादी व्यक्ती मंदिरात जाते, तरी तिथेही तो *फक्त मागणं* करतो –

"देवा, मला हे हवं", "माझं ते पूर्ण कर"...

पण असं फार क्वचित ऐकायला मिळतं –

*"देवा, मला काहीतरी द्यायचं आहे"*

*"माझ्याकडे जे आहे, ते मी तुला अर्पण करतो"*


कारण, आपली अपेक्षा इतकी खोलवर मुरलेली असते, की दुसऱ्याला काही देणं हे आपल्याला सुचतच नाही.

पण जेव्हा माणूस सतत 'मी' या विचारात राहतो,

तेव्हा त्याचं मन *कधीच स्थिर राहत नाही.*

तो *निराश*, अस्वस्थ असतो.

कधीच समाधानी नसतो.


आपल्याला वाटतं की आपल्याभोवतीचे लोक आपल्याच्या अपेक्षा पूर्ण करायला हवे,

पण खरंच...


-का कोणी तुमचं समाधान करण्यासाठीच जगतंय?*


जर तुम्हाला तसं वाटत असेल,

तर माफ करा –

वेळ तुम्हाला सगळं शिकवेल.


शेवटी एकच सांगावंसं वाटतं:


> "Be realistic in your expectations...

> You will never feel frustrated."

अपेक्षांपासून थोडंसं दूर जा,

"मी" वरून "आपण" कडे वळा,

तेव्हाच तुम्ही खरं *स्वतःला* ओळखाल.


---


✍ #Santoshhadapad


बिनडोक म्हणावे त्यांना?

बिनडोक म्हणावे त्यांना?

माझंच हवं, माझंच चालावं,
माझ्या वेळेसच जग वळावं,
मी मूडी असेन, बोलू नका,
मी हसत नसेन, जवळ येऊ नका...

पण जेव्हा मी बोले, ऐका सगळं,
माझ्या दुखांवर टाका बाम थोडं,
मी बिझी असेन तर त्रास नको,
तुमचं दुःख? त्याला वेळच नको!

मग जे लोक थांबून घेतात,
मन जपत, स्वतः झाकून जगतात,
समजून घेतात माझे रंग,
ते खरोखरच का असतील दंग?

ते बिनडोक नाहीत, ते माणसं आहेत,
ज्यात अजूनही प्रेमाचं पाणी आहे,
माझ्या स्वार्थी सोबत ते चालले,
मन दुखवूनही कधी न हटले.

पण एक दिवस थकतील तेही,
विरतील त्या डोळ्यांतली ओलही,
तेव्हा उमगेन, मी एकटा आहे,
सगळ्या "माझ्या" मध्ये हरवलं "आपलं" काही.

म्हणून अजून वेळ आहे, समजून घे,
तुझा वेळ नाही, सर्वांचाही वेळ आहे रे,
समोरील चेहऱ्यांमध्ये स्वतःला बघ,
"बिनडोक" नव्हे, तेच तुझं खरं धन ठरू शकतं मग.

Monday, 6 May 2024

यादें

 तू पास भी है मेरे, पर तू पास नही,

तू दूर भी है, पर इतनी भी दूर नही,

इंतजार की इन तनहाई भरी रातों से यूं कुछ लगाव हो रहा है,

बस अब अंधेरों से भी एक रिश्ता जुड़ गया है,

सोचते है वो मंजर क्या होगा,

 जब आपकी यादें इस दिल की आखिरी धड़ाकोनो से भी आजाद हो जायेगी, 

काश तब तो तू मेरी  बेताब मोहब्बत को रूबरू हो जाएगी

Wednesday, 7 August 2019

असावं असं कुणीतरी....

आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं..
इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं..
मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं..
कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार...
आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं..
मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं...
आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं,
दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं...
खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.